25 Jul 2026
नमस्कार
मी राजेंद्र पुंगळे
BHMS च शिक्षण पूर्ण झाले आहे.
आणि संभाजीनगर विभाग संयोजक अशी सेवांकुर ची जबाबदारी आहे.
नाही, नाही, नाही.....
आता उद्या पासून असा परिचय नसेल,
परिचय करून देताना, गेली दोन वर्षे जिभेला आणि मनाला लागलेली ही सवय आता थांबवायची आहे. कारण आता ही जबदारी नसेल , हो मी जबाबदारी म्हणतोय कारण सेवांकुरमध्ये जबाबदारी असते पद नाही. यानंतरही मी सेवांकुर मध्ये कुठल्या ना कुठल्या जबाबदारीत असेलच, पण ही माझी सेवांकुरची पहिली मोठी, आणि मला घडवणारी जबाबदारी होती. कुठल्या जबाबदारीत असेल ते उद्या उद्याच्या वार्षिक नियोजन बैठकीत कळेलच.
पण आज मागे वळून पाहताना खूप सारे अनुभव घेऊन ह्या जबाबदारीतून मुक्त होत आहे, तेच अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा लेख लिहत आहे.
हा लेख म्हणजे माझ्या सेवांकुर प्रवासाचा, मला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि सेवांकुरमुळे माझ्यात झालेल्या बदलांचा एक छोटासा हिशोब आहे.
June २०२२ ला
डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉ. अश्विनीकुमार तुपकरी सरांची झालेली भेट... आणि तिथून सुरू झाला माझा सेवांकुर चा प्रवास...
२०२३ मध्ये One Week for Nation झाबुआ मध्ये विद्यार्थी म्हणून सहभागी झालो, आणि सेवांकुर बद्दल कुतूहल निर्माण झाले.
सेवांकुर च उद्देश काय, OWFN मध्ये घेतलेल्या एका दिवसाच्या कॅम्प ने ह्या गावातील लोकांचं कायच भल होणार आहे ?
असे अनेक प्रश्न होते...
२०२३ च्या व्यक्तित्व विकास शिबिरामध्ये ( PDC ) सहभागी होण्यासाठी पत्र मिळाले, काहीही विचार न करता मी PDC ला गेलो. या PDC मध्ये सेवांकुर च काम, त्या कामाची गरज समजली आणि डॉ. तुपकरी सर आमचे गट कन्सल्टंट होते. मनात अनेक प्रश्न होते या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला सरानी दिली. यावेळी प्रसन्न पाटील सरही पूर्णवेळ शिबिराला उपस्थित होते आणि सरांकडूनही, समरसता, जाती- पाती, आरक्षण, राजकारण याबद्दल असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर मी मिळून घेतली.
आणि ठरवलं की सेवांकुर चे काम करायचे, सेवांकुर सोबत जोडून राहायचं.
एक वर्षानंतर, २०२४ च्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात माझ्यावर निवास व्यवस्था प्रमुख म्हणून जबाबदारी आली.
अचानक वाढलेली विद्यार्थी संख्या, मर्यादित साधने, सततची धावपळ... पण एकही अडचण निर्माण होऊ न देता काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर
मला संभाजीनगर विभाग संयोजक म्हणून जबाबदारी दिली. त्यांनी माझी Pathy पाहिली नाही...मी स्टेजवर किती चांगलं बोलतो हे पाहिलं नाही...मी खेड्यातून आलोय हेही पाहिलं नाही...
आणि खरं सांगायचं तर, त्यांनी माझ्यावर काय पाहिलं हे आजही मला नक्की सांगता येत नाही...
संभाजीनगर विभाग संयोजक...
जबाबदारी तशी साधी वाटते, पण तितकीच मोठी जबाबदारी, कारण सेवांकुर दृष्ट्या संभाजीनगर राजधानीचे शहर, अचानक येऊन ठेपणारे कार्यक्रम, DHR visit, इतर संस्था, मंडळी यांच्या आपल्याकडून वाढलेल्या अपेक्षा हे सगळं manage करणं वाटत तेवढं सोप नाहीये, पण अवघड असलं तरी सेवांकुर त्यासाठी आता कटिबद्ध आहे. ह्यासोबतच माझ्या टीममधील अनेक जण माझ्यापेक्षा वयाने, शिक्षणाने आणि सेवांकुरच्या अनुभवाने खूप मोठे होते.
कोणी प्राध्यापक...
कोणी नामांकित डॉक्टर...
कोणी अनुभवी कार्यकर्ते...
अशा लोकांन सोबत संयोजक म्हणून काम करणं सुरुवातीला माझ्यासाठी खूप अवघड होतं.
पण हळूहळू कार्यपद्धती समजत गेली...
लोक समजत गेले...
आणि नेतृत्व म्हणजे आदेश देणं नव्हे, तर सर्वांना सोबत घेऊन चालणं असतं, हे शिकायला मिळालं.
आज खात्रीने सांगू शकतो... हे शिक्षण मला पुढच्या संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडणार आहे.
संयोजक म्हणजे नेमकं काय ?
ही जबाबदारी समजून घेण्यासाठी प्रशांत सरांसोबत झालेली दोन तासांची स्वतंत्र बैठक आजही डोळ्यासमोर उभी राहते.
असं कित्येक वेळा सरांनी वेळ दिला.
काम शिकवलं...
नवीन कौशल्यं शिकवली...
चुका झाल्या तर मोठ्या भावासारखं समजावलं...
आणि कधी टोमणे मारत, तर कधी पाठीवर कौतुकाची थाप देत सतत घडवत राहिले.
आज मी जो काही घडलो आहे, त्यामध्ये प्रशांत सरांचा सिंहाचा वाटा आहे.
पहिलं वर्ष शिकण्यात आणि जबाबदारी समजून घेण्यात गेलं.
वाटलं... आता वर्ष संपलं म्हणजे माझी जबाबदारीही संपेल.
पण पुन्हा डॉ. नितीन पाटील सरांचा फोन आला...
"जबाबदारी पुढे सुरू ठेव."
मी पहिल्यांदा स्पष्ट नकार दिला.
कारण फायनल इयरमध्ये कॉलेज, क्लिनिक आणि सेवांकुर यांचा समतोल कसा साधला, हे मलाच माहीत होतं.
इंटर्नशिपमध्ये ते जमेल की नाही, याची भीती होती.
तेव्हा सरांचं एक वाक्य आजही आठवतं...
"जे शिकला आहेस, आता ते प्रत्यक्षात उतरवायची वेळ आली आहे. आता मागे फिरलास तर काहीही मिळणार नाही ."
मी विचार केला...
आणि पुन्हा एकदा "हो" म्हणालो.
आज वाटतं...
तो निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता.
दुसऱ्या वर्षी टीम अधिक strong होती, पण त्यातही सुदेश आणि गायत्री यांच्यासारख्या लोकांसोबत काम करायचं म्हणलं तर थोडी चिंता होतीच, पण हळू हळू तेही शिकलो कारण त्याशिवाय पर्याय नव्हता, अशी लोक मला पुढील आयुष्यात मिळाली तर मला सांभाळणं आता काही जड जाणार नाही
पण काहीही असो दोघेही खूप छान मित्र आहेत माझे प्रत्येक सुख दुःखात सोबत असतात माझ्या,
बहुतेक...
हीच सेवांकुरची खरी जादू आहे.
दोन वर्षांपूर्वी नवीन लोकांशी बोलताना मी खूप गोंधळायचो.
माझ्यात Pathy चा inferiority complex होता.
आज मात्र परिस्थिती पूर्ण बदलली आहे.
आता कोणाशीही सहज बोलू शकतो...
नवीन माणसं जोडू शकतो...
आणि माणसं ओळखायलाही शिकलो आहे.
सेवांकुर मध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी येतात, कोणी गायक, कोणी वक्ता, कोणी लीडर, तर कोणी अगदी माझ्यासारखा कशातच परिपूर्ण नसलेला, पण इथे प्रत्येकाला परिपूर्ण बनवलं जात ते कस तर - सेवांकुर मध्ये इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला काम दिलं जात,शिकवलं जात. बहुधा त्याला ते आवडणारच असत , आणि त्यामुळं प्रत्येकजण ते आनंदाने करतो. यातून शिकलेली एक गोष्ट मात्र आयुष्यभर लक्षात राहील...
प्रत्येक माणसात काहीतरी विशेष असतंच, कोणीही निरुपयोगी नसतो, फक्त त्याच्यातील योग्य गुण ओळखून त्याला योग्य जबाबदारी द्यायला आली पाहिजे.
मागच्या सहा महिन्यांत अनेक नवीन कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या...आणि त्यांनी त्या अपेक्षेपेक्षाही उत्तम पार पाडल्या. आणि त्यातूनच आज जबाबदारी मुक्त होताना समाधान आणि आनंद आहे , कारण पुढची टीम आमच्यापेक्षा डबल ताकदीची असणार आहे. ( आपल्यापेक्षा कोणीतरी चांगली माणसं या जबाबदाऱ्या बघणार आहे हा आनंद फक्त सेवांकुर येथेच होऊ शकतो, बाकीकडे बघतो तर लोकांना पोटदुखी होते.) सेवांकुर च काम संभाजीनगर विभागात आणखी वेगाने पुढे जाणार, यात काही शंकाच नाही.
या प्रवासात मला अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला...मोठी माणसं जवळून अनुभवायला मिळाली...आणि त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं, आयुष्यभरासाठी मार्गदर्शन करणारी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी मिळाली, चागलं काम करण्याची प्रेरणा मिळाली. एवढंच नाही तर माझ्यासोबत काम करणारे सगळेच "एक से बडकर एक आहेत", सगळे जिवाभावाचे लोक आहेत, ही शिदोरी मला आयुष्भर पुरणारीआहे,
आज मागे वळून पाहताना जाणवतं...
"मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य असेल माझे" , त्यामुळं मला ही माणसं आणि सेवांकुर मिळालं.
माझ्यासोबत काम करणारी विभाग टीम, सर्व कॉलेज टीम व संभाजीनगर मधील सर्व कार्यकर्ते या सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी मला समजून घेतलं, आणि खूप काही शिकवलं, भरभरून प्रेम दिलं आणि देत आहात.
सेवांकुरमध्ये एक गोष्ट विशेष शिकायला मिळाली...
इथे प्रत्येकजण सेवाभावाने काम करतो.
कोणालाही मोबदला मिळत नाही.
म्हणून कोणावर रागावून काम करून घेता येत नाही.
फक्त माणूस जपून, समजून आणि सोबत घेऊन चालावं लागतं.
पूर्वी मी खूप रागीट होतो, पण सेवांकुरमध्ये कोणी चुकलं किंवा काम नीट केलं नाही तर मी कोणाला रागावलो नाही कारण ती आपली पद्धत नाही. आता तर मी चुकूनही कोणालाच रागवत नाही. या दोन वर्षाच्या प्रवासात मी चुकूनही एखाद्याला रागावलो असेल तर मी मनापासून माफी मागतो. आपलाच मित्र भाऊ म्हणून माफ कराल.
हे सगळ करताना...
माझं MBA कधी पूर्ण झालं कळलंच नाही.
आणि गप्पा करताना आमच्या तोंडून " It was my first MBA... from the Top H-School – School of Humanity. " अस निघूनही जात.
ही फक्त एक जबाबदारी नव्हती.
हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रवास होता.
जर कधी सेवांकुरमध्ये तुम्हाला अशी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली...
तर ती कधीही नाकारू नका.
कारण इथे तुम्ही फक्त काम करत नाही...
इथे तुम्ही स्वतःला घडवत असता.
शेवटी...
या दोन वर्षांत मी जे काही शिकलो,
जे काही कमावलं,
जे काही जगलो...
इतरांना दिसणारा समजदार पना माझ्यात आला...
ते कोणत्याही पदामुळे नाही...
तर सेवांकुर मुळे, सेवांकुरने दिलेल्या जबाबदारी मुळे, सेवांकुर मधील मित्रन मुळे,
प्रत्येक मित्रासाठी ...
प्रत्येक ज्येष्ठांच्या मार्गदर्शनासाठी...
आणि या सुंदर प्रवासासाठी...
मी सेवांकुरचा कायम ऋणी आहे...
होतो...
आहे...
आणि राहीन...
हे ऋण कधी फेडता येणार नाही...
पण आयुष्यभर सेवेमधून, सेवांकुरच, समाजच काम करून ते फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की करीन.
धन्यवाद, सेवांकुर!
हेच सेवांकुर भारतभरातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
सेवांकुर,
तू मला फक्त जबाबदारी दिली नाहीस...
तू मला "मी" दिलास.
आपलाच
@राजेंद्र